शिवसेना राष्ट्रवादीची बटीक, ती आता रसातळाला गेलीय; दरेकरांचा हल्लाबोल

संजय राऊतांनी राज ठाकरेंवर पुतण्या मावशीचं प्रेम दाखवू नये असा टोलाही दरेकरांनी लावला आहे.
Pravin Darekar-Sanjay Raut
Pravin Darekar-Sanjay Rautgoogle

मुंबई : "राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला आहे, रद्द झाला नाही." असं म्हणत भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा आणि संजय राऊतांचा वापर राष्ट्रवादी वापर करत असून शिवसेना रसातळाला जात आहे." अशी बोचरी टीका दरेकरांनी राऊतांवर केली आहे.

(Pravin Darekar On Sanjay Raut And Shivsena)

"तुमचा वापर होत आहे, आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतं आहे. राष्ट्रवादीच्या वापरामुळे शिवसेनेची दुर्दशा होत आहे याकडे लक्ष द्या." असं ते बोलताना म्हणाले आहेत.

Pravin Darekar-Sanjay Raut
भारतासाठी आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकून देण्याची इच्छा : विराट

"महाविकास आघाडी सरकार बनवत असताना सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून संजय राऊत यांनी ठेवली आहे. त्यातून तुम्हाला काय मिळालं याचा अभ्यास त्यांनी करावा, दुसऱ्यांचं शहाणपण काढण्यापेक्षा आपल्याकडे लक्ष द्या." असं म्हणत दरेकरांनी राऊतांना फटकारलं आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे खासदारांनी विरोध केल्याच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, ते त्यांचं वैयक्तिक मत होतं, काही लोकांनी त्यांना पाठिंबाही दिला पण ही त्यांची अधिकृत भुमिका नव्हती, हा प्रश्न चर्चेने सोडवला जाईल आणि राज ठाकरेंचा दौराही होईल." असं ते म्हणाले.

Pravin Darekar-Sanjay Raut
सभेआधीच पुण्यात मनसेला धक्का; वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याचा पक्षाला रामराम

"राज ठाकरे यांना आयोध्या दौऱ्यापासून कुणीही रोखू शकत नाही, त्यांचा दौरा होणार आहे." असं म्हणत दरेकरांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावर विश्वास दाखवला आहे. संजय राऊतांनी मनसेला मदत केली असती असं वक्तव्य केलं होतं, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, "शिवसेनेचं प्रेम म्हणजे पुतण्या मावशीचं प्रेम. हे प्रेम संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या बाबतीत दाखवू नये." असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी दौऱ्याला स्थगिती दिल्याचं सांगितलं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com