चंद्रकांत पाटील सर्वात भंपकमंत्री

राजेभाऊ मोगल 
शनिवार, 30 जून 2018

औरंगाबाद : मराठा समाजातील मुलांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी 50 टक्‍के सलवत दिल्याची घोषणा झाली. मात्र, सरकारवर विश्‍वास ठेवण्यासारखी परिस्थितीच राहीली नाही. निवडणुकीपूर्वी दिलेल्या कुठल्याच आश्‍वासनाची पुर्तता झालेली नाही. तरीही पोकळ घोषणा सुरुच असून सर्वांत भंपकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडेच मुख्यमंत्री का महत्वाची खाती देत आहेत, असा सवाल मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी येथे केला. 

औरंगाबाद : मराठा समाजातील मुलांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी 50 टक्‍के सलवत दिल्याची घोषणा झाली. मात्र, सरकारवर विश्‍वास ठेवण्यासारखी परिस्थितीच राहीली नाही. निवडणुकीपूर्वी दिलेल्या कुठल्याच आश्‍वासनाची पुर्तता झालेली नाही. तरीही पोकळ घोषणा सुरुच असून सर्वांत भंपकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडेच मुख्यमंत्री का महत्वाची खाती देत आहेत, असा सवाल मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी येथे केला. 

रायगड जिल्ह्यातील अलीबाग येथे 6 व 7 ऑक्टोबारला होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी  गायकवाड मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी (ता.30) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गाडयवाड म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. नारायण राणे यांच्या समितीने मराठा समाजाला 16 टक्‍के तर मुस्लिमांना 5 टक्‍के आरक्षण दिले होते. या अहवालास नंतर स्थगीती दिलेली आहे. सध्या आरक्षणाबाबतच्या अभ्यासाची जबाबदारी मागसवर्ग आयोगाकडे देण्यात आलेले आहे. खरे तर राणे समितीवर काम करणे अपेक्षीत असताना, तामिळनाडूचा आधार कसा घेतला, याची पाहणी करणे गरजेचे असताना हा आगोग धर्माची चिकीत्सा करण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

मराठा समाजाच्या दुसऱ्या टप्यातील मोर्चाच्या पर्वाला तुळजापूर येथून सुरवात झाली, यात आपण सहभागी होणार का, असे विचारले असता, या मोर्चात ज्ञानी, अभ्यासू लोक असल्याचा उपरोधिक टोला लावत सध्यातरी संघटनेच्या मर्यादेतच काम करण्याची आपली इच्छा असल्याचे गायकवाड यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेस हिंदूराव हुजरे पाटील, सुधीर भोसले, सुभाष बोरकर, शांताराम कुंजीर, अमोल मिटकरी, शरद चव्हाण, आत्माराम शिंदे, राहूल बन्सोड, शाम नळकांडे, राजेंद्र आढाव उपस्थित होते. 

आगामी काळात 'रोल प्ले'करू
 कर्जमाफीची घोषणा केली असली तरी मुळात सरकारकडे पैसेच नाहीत. त्यामुळे वास्तववेगळे आहे. ज्या शेतीवर संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याचे प्रश्‍न सुटण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे आगामी काळात समाजाच्या विविध प्रश्‍नांवर आम्हाला रोल प्ले करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही सामाजिक दबाबगट म्हणून राज्यात महत्वाची कामगीरी करू. व्यक्‍तीची हत्या करून विचार मरत नसतो, हे लक्षात न घेणाऱ्या धार्मिक हिंदूत्ववाद्याला आमचे पदाधिकारी पुरून उरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

एक क्‍किंटल मोगरा फुलांच्या हाराने सत्कार 
पुणे येथे राजर्षी शाहू महाराजानी स्थापन केलेल्या अ. भा. मराठा शिक्षण परिषदेच्या सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी आजोबा आनंदराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ एक कोटी रुपये देणगी दिल्याबद्दल परभणी जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे छगन शेरे व कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचा एक क्‍किंटल मोगरा फुलांच्या हाराने सत्कार केला. यामुळे सभागृहात चोहीकडे सुगंध दरवळत होता.

Web Title: pravin gaikwad criticizes minister chandrakant patil