राज्यात उद्यापासून  पूर्वमोसमी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे - विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या गुरुवारपासून (ता. 5) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (ता. 6) आणि शनिवारी (ता. 7) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. 

उत्तर छत्तीसगड आणि झारखंड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे; तर पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, केरळपर्यंत हवेचा उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यास हवामान पोषक होत आहे, तर मंगळवारपर्यंत गुजरात आणि राजस्थान वगळता उर्वरित देशात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, पश्‍चिम उत्तर प्रदेशात धुळीची वादळे येण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भात उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून, 43 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले तापमान 41 अंश सेल्सिअस किंवा त्याहून खाली उतरले आहे. राज्याच्या इतर भागात मात्र उन्हाचा ताप कायम आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे सर्वाधिक म्हणजे 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.2 अंश सेल्सिअसवर राहिला. 

Web Title: Pre-monsoon rain from tomorrow in the state