राज्यात आणखी दोन दिवस पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागांत सोमवारी (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागांत सोमवारी (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातही चोवीस तासांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, वादळी वाऱ्याची शक्‍यता आहे. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पुण्यात १.४ मिलिमीटर पाऊस झाला.

मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, साताऱ्यासह राज्याच्या बहुतांश भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.  पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल. विदर्भात मात्र उष्णतेची लाट निर्माण होईल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

पुणे ३९.९ अंशांवर
पुण्यात आकाश ढगाळ असले, तरीही कमाल तापमानाचा पारा ३९.९ अंश सेल्सिअस नोंदला गेला. लोहगाव येथे ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. शहरात दुपारी अतिनील किरणांचा निर्देशांक ४.७ अंश सेल्सिअसवर होता. संध्याकाळी शहराच्या मध्यवर्ती भागासह सिंहगड रस्ता, कात्रज, मांजरी, केशवनगर, मुंढवा, मयूर कॉलनी, कोथरूड या भागांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. दरम्यान, सोमवारी (ता. १५) शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता आहे.

Web Title: predicted to rain in two days in the state