मराठा आरक्षणाचे श्रेय एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही- प्रीतम मुंडे

मराठा आरक्षणाचे श्रेय एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही- प्रीतम मुंडे

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचे श्रेय मी एकट्या मुख्यमंत्र्यांना देत नसून याचे श्रेय संपूर्ण मराठा समाजाला असल्याचे भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रेंगाळलेला हा आरक्षणाचा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला असून त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम झाले असल्याचे मुंडे म्हणाल्या. 

आरक्षण मिळाले तर न्यायालयाची जमेची बाजू आणि नाही मिळाले तर सरकारची जबाबदारी असे नसते. मराठा आरक्षण देण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा असल्याचे मुंडे यांनी लोकसभेत सांगितले.

विशेष म्हणजे प्रीतम मुंडे यांनी आपले भाषण मराठीत केले. त्यांनी लोकसभा सभागृहात विद्यापीठ अनुदान आयोगातील शिक्षक नियुक्त्यासंबंधी सुधारणा विधेयकाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरीवाल यांचेही अभिनंदन केले. त्यानंतर आरक्षणावर बोलताना त्यांना मुख्युमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. यावेळी बोलताना मुंडे यांनी ओबीसींच्या जनगणनेचीही मागणी केली तसेच त्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी सरकारकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com