गर्भवती शिक्षिकांची बदल्यांत परवड! 

सिद्धेश्‍वर डुकरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - स्तनदा, गरोदर, अपंग महिला शिक्षक महिलांची बदल्यांत परवड झाली आहे. आंतरजिल्हा बदल्या करताना ग्रामविकास विभागने ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब केला. यात सरसकट बदल्या केल्यामुळे सुमारे शंभरच्या आसपास स्तनदा, गरोदर, अपंग शिक्षक महिलांवर अन्याय झाला आहे. 

मुंबई - स्तनदा, गरोदर, अपंग महिला शिक्षक महिलांची बदल्यांत परवड झाली आहे. आंतरजिल्हा बदल्या करताना ग्रामविकास विभागने ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब केला. यात सरसकट बदल्या केल्यामुळे सुमारे शंभरच्या आसपास स्तनदा, गरोदर, अपंग शिक्षक महिलांवर अन्याय झाला आहे. 

राज्याच्या ग्रामविकास विभागाने 2018 मध्ये बदल्या करताना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे. या बदल्या करताना पती-पत्नी एकत्रीकरण, स्तनदा माता, गरोदर, अपंग महिला शिक्षकांचा त्यांच्या अडचणी विचारात घेतल्या नाहीत. यामुळे या महिला शिक्षिका आपल्या मुलांसह मंत्रालयात ग्रामविकास विभागाच्या सचिवांना साकडे घालत आहेत. तरीही सचिवांची भेट मिळू शकली नाही. 

अतिदुर्गम डोंगराळ भागात वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी गरोदर आणि स्तनदा महिला शिक्षकांच्या सरसकट बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाताना या महिला शिक्षकांना अडचणीचे होत आहे, तसेच अशा महिला शिक्षक आणि त्यांचे कुटुंब नोकरीच्या ठिकाणापासून 100 ते 200 किलोमीटर अंतरावर बदल्या झाल्या आहेत. याचबरोबर शाळेच्या ठिकाणी जाताना किमान पाच किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत आहे. याचा तब्येतीवर परिणाम होत आहे. याचा नवजात बालक आणि माता यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे. सरसकट बदल्या केल्यामुळे या व्यावहारिक अडचणी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. परिणामी, या महिला शिक्षकांना ग्रामविकास मंत्रालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. तरीही सहानभूती आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. 

त्रुटी पुन्हा उघडकीस 
स्तनदा, गरोदर आणि अपंग महिला शिक्षकांच्या 2017 मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये व्यावहारिक अडचणी पाहून नंतर बदल्या केल्या होत्या. मात्र यंदा तसे झाले नाही. शिक्षकांच्या बदल्यावरून 2018 मध्ये अनेक शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या आहेत. यंदा ग्रामविकास खात्याने ऑनलाइन प्रक्रिया राबवली आहे. यात अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे प्रकार पुढे आले आहेत. 

Web Title: Pregnant teachers transfer issue