अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटीच्या परीक्षेची तयारी’ झाली सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातून जवळपास सोळा लाख ४२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली आहे.
Admission
AdmissionSakal

पुणे - दहावीची परीक्षा (SSC Exam) रद्द (Cancel) केल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना (Student) उत्तीर्ण केले जाणार आहे. मात्र, त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) (CET Exam) घेण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे. मात्र, याबाबत शिक्षण विभागाने कोणताही निर्णय जाहीर केलेला नसताना खासगी क्लासवाल्यांनी (Private Class) ‘सीईटीच्या परीक्षेची तयारी’ सुरू केली आहे. (Preparation for CET exam for 11th admission has started)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातून जवळपास सोळा लाख ४२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली आहे. आता या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन करण्यात येणार आहे. तसेच अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जवळपास ६५ टक्के विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याला होकार दर्शविला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल आणि सीईटी परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाचा निर्णय गृहीत धरून खासगी क्लासवाल्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अकरावी सीईटीची तयारी सुरू करण्यासाठी क्लासमध्ये सहभागी होण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना विचारणा केली जात आहे.

Admission
आजीबाईंचं वय 80 आणि 35 दिवसांची कडवी झुंज! कोरोनावर इच्छाशक्तीने मात

पालकांना उपस्थित केलेले प्रश्न :

अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा होणार की नाही!, होणार असल्यास ती कशाप्रकारे घेतली जाईल, या परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रारूप कसे असेल, त्यात कोणत्या विषयांचा समावेश असेल, हे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही. असे असताना क्लासवाले कोणत्या आधारे या परीक्षेची तयारी करून घेणार आहेत, शासन निर्णय होण्याअगोदर तो निर्णय क्लासवाल्यांना कळविण्यात आलेला आहे का!, असे प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.

शिक्षण विभागाने लवकरात लवकर स्पष्टता करणे आवश्यक

‘दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन, अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा, बारावीच्या परीक्षा याबाबत राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभाग भरकटलेल्या स्थितीत आहे. परीक्षेबाबत निर्णय घेऊन एक महिना होत आला, तरी अद्याप ठोस मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असुरक्षितता आहे. याच वातावरणाचा फायदा खासगी क्लासवाले घेत आहेत. त्यामुळे पालकांचा गोंधळ अधिकच वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचाही विचार करून शिक्षण विभागाने दहावीचे अंतर्गत मूल्यमापन, अकरावीचे प्रवेश कसे होणार, बारावीची परीक्षा होणार की नाही, याची लवकरात लवकर स्पष्टता करायला हवी.’’

- मुकुंद किर्दत, समन्वयक, पुणे पॅरेंट्‌स युनाईटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com