महाराष्ट्राचे "महाब्रॅंड' तयार करा - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सोलापूर - कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत शेतकरी; तसेच बचत गटांच्या उत्पादनाचे विपणन करणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राचे महाब्रॅंड तयार करून जागतिक पातळीवर राज्यातील उत्पादनांना योग्य भाव कसा मिळवून देता येईल, यासाठी आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्या कंपन्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

सहकारी पणन व्यवस्थेमध्ये कंपन्यांचा सहभाग या विषयावर मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन, महिंद्रा, क्रॉम्पटन ग्रीव्हज, टीसीएस, आदित्य बिर्ला रिटेल लिमिटेड, रिलायन्स फ्रेश, अपना बाजार, जे. एस. डब्लू. फाउंडेशन, इंडियन मर्चंड चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, ऍग्री न्यूट्रिशन हेल्थ, बिग बझार या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीत बिग बझार या कंपनीने हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर देशमुख यांनी ही खरेदी थांबविण्यास सांगितले. टाटा कन्सल्टंट कंपनीने शेतकऱ्यांचा शेतमाल साडेअकरा टक्के व्याजाने तारण ठेवला आहे. सरकारच्या शेतमाल तारण योजनेतंर्गत शेतकऱ्यांचा केवळ सहा टक्‍क्‍यांनी माल तारण ठेवला जातो. याउलट टाटा कन्सल्टंट कंपनीने अधिकचे व्याज घेऊन शेतकऱ्यांना माल तारण ठेवत आहे, त्यांनी ते तत्काळ थांबविण्यासही देशमुख यांनी सांगितले. 

बिग बझार, अपना बाझार, डी मार्ट यांनी शेतमाल व बचत गटांचा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे प्रभावी ब्रॅंडिंग करावे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारले जाऊ शकतात. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

Web Title: Prepare Maharashtra's Mahabrand