राष्ट्रपती निवडणूक: छगन भुजबळ, रमेश कदम यांनी केले मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम तासाभरासाठी कारागृहातून बाहेर पडले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचे मतदान होत आहे.

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधानभवनात आज (सोमवार) मतदान सुरु असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व रमेश कदम यांनीही मतदान केले. 

आज सकाळी दहा वाजता मतदानाला सुरवात झाली. पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री मदन येरावार, विजय देशमुख आदींनी मतदान केले. अजित पवार, एकनाथ खडसे, आदिंनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी कारागृहातून बाहेर आले होते.

कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम तासाभरासाठी कारागृहातून बाहेर पडले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचे मतदान होत आहे. भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात जेलमधून विधानसभेत मतदानासाठी आणले होते. मतदान  मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा कारगृहात नेण्यात आले.

Web Title: president election Chagan Bhujbal and Ramesh Kadam cast vote