राज्यातील 50 जणांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

मुंबई - राज्य पोलिस दलातील 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील 10 पोलिस, उल्लेखनीय सेवेसाठी तिघे, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक मिळविणाऱ्या 37 जणांचा यात समावेश आहे. 

मुंबई - राज्य पोलिस दलातील 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील 10 पोलिस, उल्लेखनीय सेवेसाठी तिघे, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक मिळविणाऱ्या 37 जणांचा यात समावेश आहे. 

नक्षलग्रस्त भागातील पोलिस उपनिरीक्षक अतुल तावडे, पोलिस नाईक इंदरशाह सडमेक, पोलिस नाईक विनोद हिचामी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदकाचा मान मिळाला आहे. उल्लेखनीय सेवेसाठी पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांत अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतसिंग सरंगल यांचा, तर गुणवत्तापूर्ण सेवेकरिता 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव, पोलिस उपायुक्त संजय शिंदे,  श्रीप्रकाश वाघमारे, राजेंद्र दाभाडे यांच्यासह 37 जणांचा समावेश आहे. 

 

पोलिस पदकाचे मानकरी 

- श्रीधर खंदारे- सहायक समादेशक, राज्य राखीव पोलिस, नागपूर 

- नितीन कौसाडीकर- सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई 

- सुनील बाजारे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल 

- फिरोज पटेल- सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई पोलिस 

- नारायण वारे- पोलिस उपनिरीक्षक, सफाळे, पालघर 

- अरविंद देवरे- पोलिस उपनिरीक्षक, जळगाव 

- विद्याधर घोरपडे- पोलिस उपनिरीक्षक, सीएसटी रेल्वे पोलिस ठाणे 

- दादा अवघडे- पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नवी मुंबई 

- आबासाहेब सुंबे- पोलिस वायरलेस, पुणे 

- उत्तम जाधव- सहायक उपनिरीक्षक, पोलिस नियंत्रण कक्ष, लातूर 

- दामोदर मोहिते- सहायक उपनिरीक्षक, मोटार ट्रान्स्पोर्ट, पुणे 

- प्रकाश तरोडेकर- सहायक उपनिरीक्षक, नांदेड 

- शांताराम वानखेडे- सहायक उपनिरीक्षक, अधीक्षक कार्यलय, जळगाव 

- अनिल दांगट- सहायक उपनिरीक्षक, अधीक्षक कार्यालय, गडचिरोली 

- संभाजी देशमुख- सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, ठाणे शहर 

- प्रकाश कोकाटे- हेड कॉन्स्टेबल, पोलिस मुख्यालय, कोल्हापूर 

- रवींद्र मयेकर- हेड कॉन्स्टेबल, दिंडोशी, मुंबई 

- हृदयनाथ साळवी- हेड कॉन्स्टेबल, मोटार ट्रान्स्पोर्ट, नाशिक 

- गंगाधर चौधरी- हेड कॉन्स्टेबल, अकोला 

- संजय शिंदे- हेड कॉन्स्टेबल तथा गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई 

- शारदाचरण तिवारी- हेड कॉन्स्टेबल, अमरावती शहर 

- संदीपकुमार रायकर- हेड कॉन्स्टेबल, कळवा, ठाणे शहर 

- संजय हुंडेकरी- हेड कॉन्स्टेबल, सोलापूर शहर 

- राजू बनसोडे- हेड कॉन्स्टेबल, गुन्हे शाखा, मुंबई 

- प्रल्हाद मदने- हेड कॉन्स्टेबल, एमआरए मार्ग पोलिस ठाणे, मुंबई 

- प्रदीप बडगुजर- हेड कॉन्स्टेबल, बीडीडीएस, जळगाव 

- रमेश शिंदे- हेड कॉन्स्टेबल, वाहतूक पोलिस, मुंबई 

- नामदेव रेणुसे- हेड कॉन्स्टेबल, पुणे शहर 

- संगीता सावरटकर- हेड कॉन्स्टेबल, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे 

- गुरुनाथ माळी- हेड कॉन्स्टेबल, राज्य दहशतवादविरोधी पथक, मुंबई 

- व्यंकटेश कुलकर्णी- पोलिस नाईक, लाचलुचपतविरोधी पथक, नाशिक 

Web Title: President's Medal of Valor in 50 people