तूरडाळीची शंभरी पार; सर्वच डाळींचे भाव गगनाला

TurDal-Pulses
TurDal-Pulses

येसगाव : सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. डाळी आवाक्‍याबाहेर झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तूरडाळीने शंभरी पार केल्याने खिचडीही बेचव झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणात खिचडी हा आवडता खाद्यपदार्थ असतो. मात्र दरवाढीमुळे खिचडीतून तूरडाळ हद्दपार होताना दिसत आहे. त्याचबरोबर मठ, मूग, चवळी, उडीद, हरभरा यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

डाळींचे भाव अनेक कारणांनी वाढतात. काही ठिकाणी पावसाचा परिणाम झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही अनेक वर्षांपासून काही पट्टे दुष्काळाच्या छायेत आले आहेत. कसमादेसह इतर तालुक्‍यांमध्ये डाळींचे स्थानिक उत्पादनही कमी झाले आहे.

प्रत्येक शेतकरी घरासाठी डाळ वर्षभर पुरेल या हिशेबाने बाजरी, ज्वारी येथे मठ, मूग, चवळी, उडदासारखे पीक पट्टा पद्धतीने पेरावयाचे. भुईमुगामध्ये बांधाला किंवा तुरीचे शेत करायचे. मात्र आता शेतकरी मका, कांदा पिकाकडे वळाल्याने कडधान्ये कमी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनाही घरात वापरासाठी सर्व डाळी दुकानांतून खरेदी कराव्या लागतात. लग्नसराई असल्यामुळे तूर व इतर डाळींना मोठी मागणी आहे.

डाळ प्रक्रिया उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांना इतर राज्यांतून माल मागवावा लागतो. त्यावर वाहतूक खर्च, आवकेचे प्रमाण यांचाही किमतीवर परिणाम होत असतो. स्वस्त धान्य दुकानात डाळींची विक्री केली जाते. मात्र त्याला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नाही. 

डाळींचे भाव प्रतिकिलो रुपयांत 
तूरडाळ : 95 ते 100 
मठडाळ : 90 ते 95 
मूगडाळ : 90 ते 95 
चवळीडाळ : 80 ते 85 
हरभराडाळ : 85 ते 90 
मसूरडाळ : 80 ते 85 
उडीदडाळ : 70 ते 75 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com