'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'

अमोल कविटकर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. वैजनाथचा आम्हाला अभिमान असून त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली आहे.

पुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. वैजनाथचा आम्हाला अभिमान असून त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली आहे.

वैजनाथ मूळचा जालन्याचा असून तो कामानिमित्त सध्या पुण्याजवळील भोसरी येथे वास्तव्यास आहे. मराठा क्रांती मोर्चाची अधिकृत भूमिका जाहीर करताना शांताराम कुंजीर म्हणाले, "गेल्या ३६ वर्षांच्या लढ्याला आणि ४२ तरुणांच्या बलिदानाने मिळालेल्या आरक्षणाला सदावर्ते खोडा घालत असून त्यांच्याबद्दल समाजात प्रचंड नाराजी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान दिलेले आहे. याबाबत विविध माध्यमांसमोर बोलताना ते मराठा तरुणांना चिथावणी देत आहेत>.``

समनव्यक रघुनाथ चित्रे-पाटील म्हणाले, "वैजनाथला मारहाण करणाऱ्या वकिलांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी. वैजनाथ आमच्या संवाद यात्रेत सहभागी झाला होता आणि नोकरीसंदर्भात त्याच्या मनात खदखद होती.``

सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर माध्यमांशी बोलल्यानंतर आज मारहाण झाली. या मारहाणीची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत हा हल्ला करण्यात आला. 

Web Title: Pride of Vaidyanath says Maratha kranti Morcha