‘आयुष्मान भारत’ योजना खाटेवर

Prime Minister Public Health Scheme
Prime Minister Public Health Scheme

सोलापूर - ‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी महाराष्ट्रातील ८३ लाख ६३ हजार कुटुंबांसह देशातील दहा कोटी ७४ लाख कुटुंबे पात्र ठरली आहेत, त्यासाठी महाराष्ट्रातील ४८२ खासगी व सरकारी रुग्णालयांचा यात समावेश होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप एकाही खासगी रुग्णालयाचा यात समावेश करण्यात आला नाही.

दुसरीकडे सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांची रिक्‍तपदे व सोयी-सुविधांचा अभाव यासह अन्य कारणांमुळे अनेक रुग्णांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ही योजना देशभर लागू केली. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचाराकरिता या योजनेतून पाच लाखांची मदत करण्यात येते. या योजनेत एक हजार ३५० आजारांचा समावेश करण्यात आला असून, महात्मा फुले आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश असून, यातून दीड लाखापर्यंतच मदत मिळते. महात्मा फुले आरोग्य योजनेचा दरवर्षी पाच लाख रुग्ण लाभ घेतात, काही जणांना सरकारी दवाखान्यात उपचाराची सोय नसल्याने महागड्या खासगी रुग्णालयांचा दरवाजा ठोठावा लागतोय. अशी परिस्थिती असताना अद्यापही खासगी रुग्णालयांचा समावेश ‘आयुष्मान भारत’ मध्ये केलेला नाही. त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे.

आयुष्मान भारत योजनेत सद्यःस्थितीत राज्यातील ८२ सरकारी रुग्णालयांचा समावेश केला आहे. खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष्मान भारत योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com