प्रशासकीय यंत्रणेच्या सक्षमीकरणास प्राधान्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 मे 2018

राज्य सरकार 72 हजार रिक्त पदे भरणार

राज्य सरकार 72 हजार रिक्त पदे भरणार
मुंबई - राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्‍यक सेवा-सुविधा पुरवण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली.

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण 72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यांत भरण्यात येतील, असे जाहीर करून यंदा पहिल्या टप्प्यात 36 हजार; तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदभरती करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील. राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे.

पहिल्या टप्प्यातील पदभरती
ग्रामविकास विभाग 11 हजार 5 पदे. सार्वजनिक आरोग्य विभाग 10 हजार 568 पदे.
गृह विभाग 7 हजार 111 पदे. कृषी विभाग 2 हजार 572 पदे. पशुसंवर्धन विभाग 1 हजार 47 पदे. सार्वजनिक बांधकाम विभाग 837 पदे.
जलसंपदा विभाग 827 पदे. जलसंधारण विभाग 423 पदे.
मत्स्यव्यवसाय विकास विभाग 90 पदे. नगरविकास विभाग 1 हजार 664 पदे.

Web Title: Priority to the empowerment of the administrative system