पुण्यातील ठेकेदाराच्या खूनप्रकरणी दोघांना तुरुंगवास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना सहा नोव्हेंबर 2017 रोजी एमआयडीसीतील तटरक्षक दलाच्या आवारात घडली होती. या खटल्याचा निकाल अकरा महिन्यांत लागला. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांनी दिला. सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे ऍड.

रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना सहा नोव्हेंबर 2017 रोजी एमआयडीसीतील तटरक्षक दलाच्या आवारात घडली होती. या खटल्याचा निकाल अकरा महिन्यांत लागला. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांनी दिला. सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे ऍड. विनय गांधी यांनी काम पाहिले. 

मिरजोळे एमआयडीसीतील एक भूखंड तटरक्षक दलाला दिला आहे. त्यामध्ये कार्यालय व इमारती बांधण्याचे काम करुणाकर नायक (रा. बेळगाव) यांनी घेतले. ते काम त्यांनी व्ही. जोसेफ थॉमस यांना कराराने दिले; तर थॉमस यांनी ते उमाशंकर कोमेश्‍वर प्रसाद (रा. वाकड रोड, नेरे, पुणे) यांना दिले. प्रसाद यांनी मदतीला मनोज नोनीया, देवेंद्र सिंग, रामसहाय पुसूराम प्रजापती यांना घेतले होते. मनोज व्यवस्थित काम करत नाही, म्हणून उमाशंकर शिवीगाळ करत असे. सहा नोव्हेंबर 2017 या दिवशी सायंकाळी मनोजने पैशाची मागणी केल्याने उमाशंकरने त्याला शिवीगाळ केली. या रागातून मनोजने रात्री उमाशंकरच्या डोक्‍यात दगड घालून त्याला ठार केले. उमाशंकरचा मृतदेह रस्त्यावर नेऊन अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळाची पाहणी आणि चौकशी केल्यानंतर तो खून असल्याने उघड झाले. 

Web Title: Prison in jail for murder of Pune contractor