कैद्यांच्या सतरंज्या थेट लंडनला, सहा कोटी रुपयांची कमाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या उत्पादनांनी दर्जाच्या जोरावर राज्यातील इतर कारागृहांना मागे टाकले आहेच; सोबत थेट लंडनपर्यंत नाशिक रोड कारागृहाच्या सतरंज्या पोचल्या आहेत. विशेष म्हणजे जीएसटी लागू झाल्यानंतर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाने 2017-18 या वर्षात सहा कोटी 14 लाख 37 हजार रुपयांची कमाई केली. 

राज्यात शेती उत्पादनात (40 लाख) अव्वल असलेल्या कारागृहाने कारखाना उद्योगात अव्वल स्थान राखले आहे. शिवणकाम विभाग (1 कोटी 89 लाख), लोहकाम (1 कोटी 47 लाख), सुतारकाम (1 कोटी 44 लाख), पैठणी विणकाम (66.36 लाख) साबण, दंतमंजन, फिनेल (37.43 लाख), बेकरी (15 लाख), धोबीकाम (6 लाख), गणेश मूर्ती (5.45 लाख) आणि चर्मोद्योग (2.25 लाख) असे उत्पन्न या कारागृहाने मिळविले आहे. 

- कारागृहातील सतरंज्या थेट लंडनला विक्रीसाठी 
- पोलिसांसाठी 60 हजार लोखंडी किट बॉक्‍स 
- दिवाळी मेळ्यात साडेचार लाखांची कमाई 
- यंदा दोन हजार गणेश मूर्तींचे लक्ष्य 
- अमरावती 87 तर नंदुरबार न्यायालयाला लाखांचे 37 फर्निचर 

कारागृहातील गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी पुढील वर्षापासून शहरातील सहाही विभागांत प्रत्येकी एकेक स्टॉल कारागृहाला दिला जाईल. तसेच कैद्यांना गरम भोजन मिळण्यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून हॉट पॉट उपलब्ध करून दिले जातील. 
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक 

कारागृह प्रशासनाचे राज्यात अव्वल स्थान कायम टिकविण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी नऊ कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. 
- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक 

जीएसटी लागू होऊनही सहा कोटींचा आकडा पार करू शकलो. दर्जामुळे कारागृहाच्या वस्तूंना मागणी आहे. 
- पल्लवी कदम, कारखाना व्यवस्थापक 

Web Title: Prisoners live directly in London, earning six crores of rupees