'पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या'

वृत्तसंस्था
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

नुकतेच भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धमक्या येत असल्याचा आरोप बिहारमधील काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे. वेस्ट विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने झुंजार अर्धशतक झळकावलं. मात्र त्याच्या खेळीचं कौतुक करण्याऐवजी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरुन राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ हा मूळचा बिहारचा खेळाडू असून, त्याला आपली खरी ओळख सांगू नये म्हणून मनसेकडून धमक्या मिळत असल्याचे अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटले आहे.

मुंबई- नुकतेच भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धमक्या येत असल्याचा आरोप बिहारमधील काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे. वेस्ट विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने झुंजार अर्धशतक झळकावलं. मात्र त्याच्या खेळीचं कौतुक करण्याऐवजी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरुन राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ हा मूळचा बिहारचा खेळाडू असून, त्याला आपली खरी ओळख सांगू नये म्हणून मनसेकडून धमक्या मिळत असल्याचे अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटले आहे.

अखिलेश प्रसाद सिंह हे काँग्रेसचे बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. गुजरातमध्ये बिहारी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न विचारला असता अखिलेश प्रसाद सिंह यांनी पृथ्वी शॉचं उदाहरण दिलं. पृथ्वी हा बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपूरचा रहिवासी आहे. मात्र त्याला महाराष्ट्रात हे सांगू दिलं जात नाही असे थेट आरोप त्यांनी केला आहे.

मनसेकडून आरोपाचे खंडन
काँग्रेस खासदाराने केलेल्या आरोपावर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आम्ही कोणालाही धमकी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणीही आमच्यावर काहीही बोलेल हे आम्ही खपवून घेणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पृथ्वी शॉला जर धमक्या दिल्या असत्या तर त्याच्या घरच्यांनी सांगितले असते. बिहारच्या खासदाराला हे कसे समजले असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला आहे.

Web Title: Prithvi Shaw Threaten By Mns