
Shivsena Case : मोदींना मुख्यमंत्री कोण हवेत? याचा निकाल उद्या लागणार ; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य!
Shivsena Case : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या मोठा निर्णय देऊ शकते. शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वादाशी संबंधित खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.
दरम्यान काँग्रेसनेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिला आहे. उद्या राजकीय निर्णय येणार आहे. मोदींना मुख्यमंत्री म्हणून शिंदे की अजून कोण हवे? याचा निकाल उद्या लागणार आहे, असे चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दोन शक्यता आहेत. एक तर एकनाथ शिंदे यांना कायम ठेवण्यात येईल. पक्षांतराबद्दलचा निकाल अध्यक्षांकडे सोपला जाईल. त्यामुळे शिंदे स्थिर राहतील. दुसरी शक्यता पक्षांतर बंदी कायद्याचे उलंघन केल्यामुळे शिंदे यांना निलंबित करण्यात येईल. त्यामुळे उद्या राजकीय निर्णय येणार. पाच न्यायधिशांचे वेगळे मत असू शकते.
माझं स्पष्ट आहे की १६ आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उलंघन केले आहे. तर कायद्यानुसार हे आमदार निलंबित होतील. तसचे या सत्रामध्ये त्यांना मंत्री देखी होता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.