सांगलीत भाजप आणखी मजबूत; पृथ्वीराज देशमुखांना उमेदवारी

deshmukh
deshmukh

मुंबई : विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी भाजपने सांगली जिल्ह्यातीलच पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देशमुख जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांचे बंधू संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

पृथ्वीराज यांनी कडेगाव विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. त्यानंतर सातत्याने 1999, 2009 आणि 2014 या निवडणुकांत पतंगरावांनी त्यांचा पराभव केला होता. पतंगराव यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपने अर्ज न भरता ही निवडणूक बिनविरोध करून दिली होती.

त्या वेळी झालेल्या घडामोडीत यापुढे आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा पृथ्वीराज देशमुख यांनी केली होती. तसेच आपण संग्राम यांच्या नेतृत्त्वाखाली कार करणार असल्याचे तेव्हा स्पष्ट केले होते.

आता भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतल्याने कडेगावमध्ये विश्वजित कदम यांच्या विरोधात संग्राम हेच उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत भाजपचे पुरेसे संख्याबळ असल्याने पृथ्वीराज यांची सहज निवड होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com