'तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई -  तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारितीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. 

तूर खरेदीचा आढावा बुधवारी सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात 191 खरेदी केंद्रांवर 9 एप्रिलपर्यंत 21 लक्ष 50 हजार 645 क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती पणन विभागाने दिली. सहकारमंत्री म्हणाले, तूर साठवणुकीसाठी 1 हजार टनापेक्षा कमी साठवणूक क्षमता असलेले लहान गोदामही ताब्यात घेण्यात यावेत. खासगी, पतसंस्थेची किंवा जी अन्य गोदाम उपलब्ध होतील ती ताब्यात घ्यावीत. तसेच शेतकऱ्यांनी 18 एप्रिलपर्यंत तूर खरेदीसाठी नोंदणीचे आवाहनही त्यांनी केले. 

Web Title: Private warehouses will be taken for storage of tur