RIPPriyankaReddy : आरोपींना जिवंत जाळा; प्रियंकाच्या आईची मागणी

वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • हैदराबादमध्ये तरुणीची 
  • अत्याचार करून हत्या 
  • चौघांना अटक
  • आरोपींना जिवंत जाळण्याची आईची मागणी 

हैदराबाद : येथील एका पशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. याप्रकरणी मुलीच्या आईने चारही आरोपींना सर्वांसमोर जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पशुवैद्यकीय डॉक्‍टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना आढळून आला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी बुधवारी कोल्लारू येथील पशु चिकित्सालयात गेली होती. तिने आपली स्कूटी शादनगर टोल प्लाझाजवळ पार्क केली होती. रात्रीच्या वेळी निघताना गाडी पंक्‍चर झाल्याचे तिला समजले. यानंतर तिने बहिणीला फोन करून गाडी पंक्‍चर झाल्याची माहिती दिली आणि आपल्याला भीती वाटत असल्याचे बहिणीला सांगितले. त्या वेळी बहिणीने तिला टोल प्लाझाला जाऊन तिथून कॅबने येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा या तरुणीने कोणीतरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले आणि फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. कुटुंबीयांनी टोल प्लाझाच्या परिसरात शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. 

मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना दणका; आरे कारशेडला स्थगिती

पीडित मुलीची आई म्हणाली, ""माझी मुलगी निर्दोष होती. तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिची हत्या करणाऱ्या आरोपींना जिवंत जाळण्याची माझी इच्छा आहे. या घटनेनंतर माझी लहान मुलगी तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकामध्ये गेली होती. मात्र, तिला शमशाबादमधील दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. पोलिसांनी वेळ वाया न घालवता मुलीचा शोध घेतला असता, तर आज माझी मुलगी जिवंत असती.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Reddy Death Case Mother wants to burn Accused