ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या  चौकशीचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - आपल्या परिवारातील सदस्यांना बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे बहाल केल्याबद्दल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्‍त तहलियानी यांनी दिले आहेत.

बावनकुळे यांच्या नातेवाइकांच्या नावाने बनलेले संपूर्ण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे नियमबाह्य पद्धतीने बनले असल्याने ते बनावट असून, ते रद्द करावीत तसेच या प्रमाणपत्रांच्या आधारे उचललेल्या सर्व मोबदल्याची वसुली करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकारात लोकायुक्‍तांकडे करण्यात आली होती. याबाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची नागपूर विभागीय लोकायुक्‍त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी करावी, असे निर्देश लोकायुक्तांनी दिले. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Web Title: The probe order of bavanakule