पैठणच्या खुल्या तुरुंगात आता गुळाचे उत्पादन

मंगेश सौंदाळकर  
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - औरंगाबादमधील पैठण येथील खुल्या तुरुंगात आता गुळाचे उत्पादन होणार आहे. तो गूळ राज्यातील विविध तुरुंगांना पुरविला जाईल. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.  

मुंबई - औरंगाबादमधील पैठण येथील खुल्या तुरुंगात आता गुळाचे उत्पादन होणार आहे. तो गूळ राज्यातील विविध तुरुंगांना पुरविला जाईल. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.  

गृहविभागाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, ३१ जिल्हा, तर १२ खुले तुरुंग आहेत. कैद्यांच्या पुनर्वसनावर तुरुंग प्रशासनाचा भर असतो. पैठणचे खुले तुरुंग क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे. तेथे १०० एकर जागेत फळ-भाज्यांसह विविध पिकेही घेतली जातात. पूर्वी तेथे उसाची लागवड केली जात असे; मात्र कालांतराने तेथे गुळाचे उत्पादन घेणे बंद झाले. तीन वर्षांपूर्वी राजेंद्र धामणे, उपनिरीक्षक (मध्य विभाग, औरंगाबाद) यांनी या तुरुंगाला भेट दिली असता, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तुरुंगातील बंद पडलेले गुऱ्हाळ सुरू करण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. या चर्चेनंतर तुरुंगात पुन्हा गुळाचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सहा कैद्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या तुरुंगात जुन्या पद्धतीने गुळाचे उत्पादन घेतले जाणार असून, तो राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये आवश्‍यकतेनुसार पुरवला जाणार आहे. वितरित करून उरलेला गूळ विक्रीसाठी ठेवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: production of jaggery in the open jail of Paithan