Professor Sushma Andhare: तेजतर्रार भाषणाने राजकारण गाजवणाऱ्या सुषमा अंधारे 'या' कॉलेज मध्ये होत्या प्राध्यापिका Professor Sushma Andhare educational background book writer teacher college | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Professor Sushma Andhare

Professor Sushma Andhare : तेजतर्रार भाषणाने राजकारण गाजवणाऱ्या सुषमा अंधारे 'या' कॉलेज मध्ये होत्या प्राध्यापिका

Professor Sushma Andhare - आंबेडकर चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्त्या, प्राध्यापिका, वक्त्या, लेखिका ते शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या हा त्यांचा प्रवास अतिशय विलक्षण आणि संघर्षाचा आहे. सुषमा अंधारे यांचे सखोल अभ्यासपूर्वक राजकीय वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली असतात. कुटुंबात कोणतेही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अंधारे पीएचडी पर्यंतचे शिक्षण कस घेतलं ? या लेखातून जाणून घेवूया..उत्कृष्ट प्राध्यापिका आहेत आपण जाणून घेऊया कोणत्या महाविद्यालयांमध्ये शिकवले आहे.

पहिल्यांदा 2003 - 4 ला कुमार स्वामी कॉलेज उदगीर लातूर येथे त्यांनी पहिल्यांदा ज्युनिअर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यावेळी त्या राज्यशास्त्र हा विषय शिकवत होत्या. 2004 ते 2006 पर्यंत दयानंद लॉ कॉलेज लातूर येथे त्यांनी शिकवले आहे. 2006 ते 2008 मध्ये इक्विटी अँड सोशल जस्टिस सेंटरच्या डेप्युटी डायरेक्ट यशदा ला होत्या.

2008 ते 2010 पर्यंत त्या लोकनायक वृत्तपत्राच्या संपादक होत्या. 2010 पासून त्या सम्यक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स सेंटरच्या त्या सीईओ आहेत. अंधाऱ्यांचा शैक्षणिक क्षेत्रातला प्रवास इथपर्यंत संपत नाही त्या उत्कृष्ट लेखिका आहेत त्यांनी कोण कोणती पुस्तक लिहिली ते सुद्धा आपण पाहूया.

त्यांनी लिहलेली पुस्तक -

'शापित पैंजण' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. ब्रेन ड्रेन थेरी यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे.

( ब्रेन ड्रेन म्हणजे काय ? 1960 च्या दशकात ब्रेन ड्रेन म्हणजेच असावे मानवी स्थलांतर ही कल्पना उदयास आली. थोडक्यात जाणून घेऊया.. जेव्हा बौद्धिकदृष्ट्या कुशल व्यक्ती एखाद्या क्षेत्रात नोकरीच्या किंवा कामाच्या शोधात असते तेव्हा आपल्या देशातला योग्य मोबदला मिळत नाही. असं वाटतं तेव्हा ती व्यक्ती इतर विकसित देशांमध्ये स्थलांतर होते आणि आपली बौद्धिक क्षमता त्या देशासाठी वापरतात. ) मीरा ललित संघर्ष हे पुस्तक त्यांनी लिहिलेल आहे. मराठी हिंदी इंग्रजी आणि राजस्थानी भाषेवरती त्यांचे प्रभुत्व आहे. असं त्यांनी सांगितले.

त्यांचं एम ए बी एड पीएचडी पर्यंतच शिक्षण आहे. नांदेड विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून त्यांनी ते शिक्षण घेतला आहे.