प्राध्यापकांचा संप कायम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह महाविद्यालयांमधील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऍड कॉलेज टीचर ऑगनायझेशनने (एमफुक्‍टो) पुकारलेल्या बंदला आज राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ झाल्याने उद्याही राज्यातील महाविद्यालये बंद राहणार आहेत. 

प्राध्यापकांच्या रिक्त जागा, तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यापीठ संघटनेच्या शिष्टमंडळापुढे दिले, मात्र त्यावर महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर ऑगनायझेशनचे (एमफुक्‍टो) समाधान झाले नाही. 

जागा भरणार 
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील महाविद्यालयात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा तातडीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, त्यात 60 टक्के जागा भरल्या जातील आणि उर्वरित 40 जागा या तासिका तत्त्वावर ठेवून या प्राध्यपकांच्या मानधनात वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच 2014 मध्ये ज्या शिक्षकांनी 71 दिवस संप केला होता त्यांच्या वेतनासाठी अर्थ विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. विद्यापीठामध्ये नवीन कायदा आल्यानंतर ज्या अधिष्ठाता आणि संचालकांच्या जागा रिक्त आहेत, त्या भरल्या जातील असे आश्वासन दिले. नेट-सेट संदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने त्याविषयी त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. 

Web Title: Professors strike continues