सोलापुरातील 2269 घरकुले रद्दचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

शासकीय योजनांमधून घरकुल मंजूर असूनही वेळेत कामे पूर्ण केली नाहीत, त्यामुळे मागील दोन वर्षांतील 443 व 2008 ते 2016 च्या कालावधीतील 1,826 घरकुले रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

सोलापूर : शासकीय योजनांमधून घरकुल मंजूर असूनही वेळेत कामे पूर्ण केली नाहीत, त्यामुळे मागील दोन वर्षांतील 443 व 2008 ते 2016 च्या कालावधीतील 1,826 घरकुले रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 40 हजार लोकांना लाभ मिळणार असून, त्यापैकी 21 हजार लाभार्थींना घरे बांधून देण्यात आली आहेत. परंतु, एका वर्षात घराचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित लाभार्थीला अनुदान दिले जात नाही. या निकषानुसार जिल्ह्यातील दोन हजार 269 घरकुले रद्द होणार असून, त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. गरिबांच्या स्वप्नातील घरे पूर्ण करण्याच्या योजना शासन राबवीत आहे.

परंतु, सर्वसामान्यांच्या परिस्थितीमुळे व अन्य अडचणींमुळे वर्षात काम पूर्ण करणे त्यांना कठीण होते. त्यामुळे नवा निकष रद्द करावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे. 
 

Web Title: Proposal to cancel 2269 houses in Solapur