मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण घटनात्मक होते. त्यामुळे ते लागू केले जावे यासाठी राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील मुस्लिम समाजाला एकत्रित करण्यात येईल व राज्यभरात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय रविवारी मुंबईत झालेल्या मुस्लिम आरक्षण संयुक्त कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे आरक्षण मिळवण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची घोषणा खासदार हुसेन दलवाई यांनी केली. 

मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर अहिंसात्मक पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंजुमन इस्लामच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. शिक्षणतज्ज्ञ पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती तयार करण्यात येईल व त्याचे स्वरूप अराजकीय असेल, असे या वेळी जाहीर करण्यात आले. मुस्लिम समाजाला मागास असल्याच्या निकषावर आरक्षण मिळावे, आम्ही इस्लाम या धर्माच्या आधारावर आरक्षण मागत नसल्याची भूमिका दलवाई यांनी जाहीर केली. मराठा आंदोलनाला या वेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

मुस्लिमांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरावी. शाळांमध्ये दर्जदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावे, आरक्षणासाठी कायदेशीर लढाईस लागणारी सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, अशी ग्वाही इनामदार यांनी दिली. या वेळी जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, माजी मंत्री अनीस अहमद यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Protests for Muslim reservation