Coronavirus : हवाई सुंदरी म्हणतात, 'कोरोनाला घाबरून कसं चालेल!'

Air-India-Crew_Members
Air-India-Crew_Members

पुणे : जगभरात 'कोरोना'चा प्रसार झाला तो विमान प्रवसातून, त्यामुळे विमान प्रवास म्हणले की धास्ती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही रोज शेकडो लोकांच्या संपर्कात येऊन विमानात सेवा पुरविणाऱ्या 'एअर क्रु मेंबरर्स'लाही तेवढाच धोका आहे. तरीही विमानात प्रवाशांना सेवा पुरविणे हे आमचे कर्तव्यच आहे. 'कोरोना'ला डगमगून कसे चालेल, अशा शब्दात हवाई सुंदरींनी आपली भावना 'सकाळ'कडे व्यक्त केली.

केंद्र सरकार व विमान कंपन्यांकडून उड्डाणे रद्द करणे यासह इतर निर्णय घेतले जात आहेत, पण 'कोरोना'च्या धास्तीने विमानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे भुवनेश्‍वर ते मुंबई विमान प्रवासात 'सकाळ'च्या प्रतिनिधीने 'एअर इंडिया'च्या क्रु मेंबरशी संवाद साधून जाणून घेतले.

''जगभरात कोरोनाचा प्रभाव निर्माण होत असताना एअर इंडियाने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आम्हाला दिल्या होत्या असे सांगत श्रेयस गोपी म्हणाले, ''सध्या प्रवशांची गर्दी कमी असली तरी दिवसभरात दोन ते चार वेळा विमान प्रवास करावा लागतो. विमानात प्रवासात रोज अनेकांशी संपर्क येतो. त्यांना जेवण, पाणी देताना स्पर्श होतो. काही वेळा त्यांच्याशी बोलताना अंतरही कमी असते. त्यामुळे हातात ग्लोज घालून आणि तोंडाला मास्क लावून काम करण्याशिवाय गत्यांतर नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने स्वताःची काळजी वाटते, पण शेवटी नोकरी असल्याने खबरदारी घेऊन काम करणे महत्वाचे.''

''नागरिकांनी प्रवास करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. सॅनिटाइजरने हात स्वच्छ करावेत, मास्क घालावा, बोलतना दोघांमध्ये व्यवस्थित अंतर असले पाहिजे. हा संसर्गजन्य रोग असल्याने आपण जेवढी काळजी घेऊ तेवढे चांगले आहे. हे आम्ही स्वताः अंमलात आणतो तसेच आम्ही प्रवाशांनाही सांगतो.'', असे आशिष कुमार यांनी सांगितले.

''विमानात प्रवास करताना कोणी आजारी वाटले, खोकला जास्त असला तर अशा प्रवाशांवर आमचे लक्ष असते. त्यांच्याकडे चौकशीही केली जाते. त्यांच्या शेजारच्या प्रवाशांना दुसऱ्या सिटवर बसण्याची व्यवस्था करतो. एअर इंडियाकडून आमच्या सह प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. अनेदा परदेशी नागरिकही विमानात प्रवास करत असतात. त्यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे सेवा दिली जाते, कोरोनाच्या भितीने आम्ही त्यांच्याशी दुजाभाव करत नाही,'' असेही गोपी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com