राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; MPSCनं केलं 'हे' आवाहन : MPSC Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

MPSC Exam: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; MPSCनं केलं 'हे' आवाहन

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. MPSCनं ट्विटद्वारे याची माहिती दिली. (Provisional Merit List of MPSC Main Exam 2021 announced appeal was made by MPSC)

प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२१ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाण कागदपत्रे पडताळणी करतानाही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ त्यामुळं पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो. उमेदवार अपात्र ठरू शकतो.

या परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम (Preference Number) पर्याय सादर करण्याकरता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ONLINE FACILITES या मेनूमध्ये 'Post Preference वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही वेबलिंक ३ मार्च, २०२३ रोजी १४.०० वाजेपासून दिनांक १० मार्च, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणं जाहीर होईल

१) वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व २० संवर्गासाठी १ ते २० मधील पसंतीक्रम अथवा No Preference' विकल्प निवडणं अनिवार्य आहे.

२) अधिसूचित सर्व पदांकरिता १ ते २० मधील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार निवडीकरीता विचार होईल.

३) अधिसूचित २० संवर्गापैकी पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे, केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही त्या पदांकरीता 'No Preference' हा विकल्प निवडावा.

४) संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर 'Download PDF हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.

५) पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.

६) विहित कालावधीनंतर संवर्ग पदार्थ पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.

टॅग्स :Maharashtra NewsMPSC Exam