फौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

दौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत दौंड पोलिस ठाण्याचे फौजदार तेजस मोहिते यांना राष्ट्रपतींचे पराक्रम पदक जाहीर झाले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर केल्याचे कळविले आहे, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

फौजदार तेजस मधुकर मोहिते यांची पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली होती. १९ सप्टेंबर  २०१५ रोजी एटापल्ली तालुक्यातील नयनगुडा - कोईंदूळ येथे नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या कमरेत गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. घनदाट जंगलातून त्यांना १३ तासानंतर नागपूर येथे रूग्णलयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला परंतु वर्षभर त्यांना झोपून राहावे लागले होते. त्यानंतर ते पुन्हा सी - ६० या कमांडो पथकात रुजू झाले व २५ मार्च २०१८ रोजी या पथकाची मेंढरी जंगलात नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत चार लाख रूपयांचे इनाम असलेली पाली उर्फ झुंकी दोरपती ही महिला नक्षलवादी ठार झाली होती. 

तेजस मोहिते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापूरात झाले असून ते कला शाखेचे (भूगोल) पदवीधर आहेत. त्यांचे वडील पोलिस खात्यातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांची गडचिरोली येथून थेट दौंड पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे.

वरिष्ठांनी मनोबल वाढविले

गडचिरोलीचे तत्कालीन अधीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अप्पर अधीक्षक राजकुमार या वरिष्ठांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने आणि मनोबल वाढवल्याने जायबंदी झाल्यानंतर पु्न्हा नक्षलवादविरोधी मोहिमेत सहभागी होता आल्याची माहिती मोहिते यांनी दिली.

Web Title: PSI Tejas Mohite is honored with the gallantry award