लोककला सर्वेक्षणाचे काम ठप्प

उत्कर्षा पाटील
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील लोककलांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला. परंतु, सात-आठ महिन्यांत एकही बैठक झालेली नसून, सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करावयाचा असल्याचे सरकारच्या परिपत्रकात नमूद आहे. परंतु, प्रकल्पाला चार वर्षे पूर्ण होत असूनही काम तिसऱ्या टप्प्यातच आहे. प्रकल्पाचे काम २०१५-२०१६ दरम्यान नियमितपणे झाले; मात्र त्यानंतर सांस्कृतिक संचालकांच्या वारंवार बदल्या झाल्यामुळे कामाचा वेग मंदावला. 

या प्रकल्पाचे काम राज्यातील नऊ विद्यापीठांकडून केले जात आहे; मात्र दोन वर्षे सांस्कृतिक खात्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वेक्षणाचे काम बंद पडल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पाबाबत या वर्षातील शेवटची बैठक जूनमध्ये सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत सांस्कृतिक विभागाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. आतापर्यंत या प्रकल्पावर दोन लाख रुपये खर्च झाले आहेत.

पुण्याच्या ललित कला अकादमीतर्फे लोककला सर्वेक्षणाचे काम पाहिले जाते. दोन वर्षांपासून सर्वेक्षणाचे काम थांबले आहे. पुढील टप्प्यांबाबत सांस्कृतिक विभागाकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. 
- डॉ. प्रवीण भोळे, प्रकल्पप्रमुख, ललित कला अकादमी

लोककला सर्वेक्षणाचे काम सात-आठ महिन्यांपासून बंद आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील काम पूर्ण झाले. दोन वर्षांत बैठका नियमितपणे झाल्या नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणासाठी सांस्कृतिक विभागाकडून अनुदान आले नाही.
- रवींद्र चिंचोलकर, प्रकल्पप्रमुख, सोलापूर विद्यापीठ

Web Title: Public Art Survey Stop