#नातंशब्दांशी : चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अॅग्रोवन दिवाळी अंकाचे प्रकाशन

agrowon
agrowon

कोल्हापूर : "शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेअॅग्रोवनचा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल," असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते "सकाळ"च्या येथील कार्यालयात शनिवारी (ता.27) झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शेतीच्या दृष्टीने कठीण काळ असताना ऍग्रोवनने नेहमीच सकारात्मक
पत्रकारिता करुन शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असे पाटील म्हणाले. एक शेतकरी म्हणून मला अॅग्रोवनविषयी नेहमीच उत्सुकता असते, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,"मी मूळचा शेतकरी आहे. मी दोन वर्षे शेतीत अनेक प्रयोग केलेले आहेत. अॅग्रोवनने विविध यशकथांच्या माध्यमातून शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो असा विश्‍वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

शेतीविषयी विचार करण्याच्या पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे, यावर पाटील यांनी भर दिला. ते म्हणाले, "मजुरांची प्रतिष्ठा वाढविणे महत्वाचे
आहे. आज मजुराला समजा महिन्याला एक लाख रुपये मिळाले तरी त्याला
लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण आहे. कारण या कामाला प्रतिष्ठा नाही.
राज्यातील दुष्काळाच्या बाबतीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुुरु आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सकाळ प्रकाशनाच्या विविध दिवाळी अंकांची माहिती दिली. सकाळ माध्यमसमुहाच्या वतीने यंदा 19 दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येत आहेत. प्रत्येक अंक हा विविध घटकांसाठी व वेगळ्या विषयांचा वेध घेणारा आहे, असे ते म्हणाले.

अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, मजुरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेने वागवणे हे यासंदर्भात महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. अॅग्रोवनने दिवाळी अंकाच्या माध्यमातून या मजूर समस्येवर कशी मात करता येईल, याची मांडणी केली आहे. यासंदर्भात प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील 26 यशकथा या अंकात आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी सकाळ कोल्हापूरचे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, सकाळचे उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, सेवा भक्तीचे निवासी संपादक निखिल पंडितराव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेदव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत, कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ, तळसंदे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप, रामेतीचे नामदेव परीट, शाहू तंत्रमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव, तसेच दिवाळी अंकात ज्यांचा यशकथांचा समावेश आहे. त्यापैकी मिलिंद पाटील, संजीवनी पाटील प्रताप चिपळूणकर, राजेंद्र कुलकर्णी, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.

अॅग्रोवनचा दिवाळी अंक आजच बुक करा अॅमेझॉनवर सवलतीच्या दरात...
 https://goo.gl/Jn7VTF
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com