'ऍग्रोवन' दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : 'शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ऍग्रोवनचा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल,' असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 'ऍग्रोवन'च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते 'सकाळ'च्या येथील कार्यालयात शनिवारी (ता. 27) झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

शेतीच्या दृष्टीने कठीण काळ असताना ऍग्रोवनने नेहमीच सकारात्मक पत्रकारिता करून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असे पाटील म्हणाले. 'सकाळ माध्यम समूहा'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी 'सकाळ' प्रकाशनाच्या विविध दिवाळी अंकांची माहिती दिली. 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने यंदा 18 दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येत आहेत. प्रत्येक अंक हा विविध घटकांसाठी व वेगळ्या विषयांचा वेध घेणारा आहे, असे ते म्हणाले. 'ऍग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, "मजुरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेने वागविणे हे यासंदर्भात महत्त्वाचे आहे.'' या वेळी 'सकाळ' कोल्हापूरचे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, 'सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, 'सेवा भक्ती'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेदव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

Web Title: Publication of agrowon Diwali issue by Chandrakant Patil