चंद्रभागेची पातळी वाढल्याने पुंडलिक मंदिर पाण्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पंढरपूर - वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. श्री पुंडलिक मंदिरासह लगच्या मंदिरांना पाण्याने वेढले आहे. आज श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेप्रमाणे गर्दी झाली आहे. एवढी गर्दी होईल, असा प्रशासनास अंदाज न आल्याने नियोजनाचा अभाव दिसून आला. 

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. आज पुत्रदा एकादशीची पर्वणी साधण्यासाठी एक लाखाहून अधिक भाविक आलेले आहेत. चंद्रभागेत स्नानासाठीदेखील पहाटेपासून गर्दी होती. 

अनेक रस्त्यांवर जागोजागी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्यांवर फेरीवाल्यांनी गर्दी केली आहे. वाहने रस्त्यांवर ठिकठिकाणी उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आदी भागांत भाविकांना चालणे मुश्‍कील झाले आहे. दर्शनासाठी सात तास लागत होते. दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलेले गणपत पाटील (रा. बत्तीस शिराळा) "सकाळ'शी बोलताना म्हणाले की, आज पहाटे चार वाजता पत्राशेडजवळ रांगेत उभा राहिलो. सात तासांनंतर दुपारी अकरा वाजता दर्शन झाले. 

Web Title: Pundalik temple in water due to increasing the water level of Chandrabhaga river