Amit Shah : अमित शाहांनी घेतली टिळक कुटुंबियांची भेट; कसबा पोटनिवडणुकीचा भाजपने धसका घेतलाय का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah met tilak family

Amit Shah : अमित शाहांनी घेतली टिळक कुटुंबियांची भेट; कसबा पोटनिवडणुकीचा भाजपने धसका घेतलाय का?

पुणेः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये शाहांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आज टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपला सगळ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. कसबा पोटनिवडणूक मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत महाविकास आघाडीसोबत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने टिळक कुटुंबातील सदस्याला भाजपची उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. परंतु भाजपने हेमंत रासने यांना मैदानात उतरवलं. मात्र दुसरीकडे टिळक कुबुंबाची वेळोवेळी नाराजी दूर करण्याचं काम भाजपने केलं. आजही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली. मात्र ही भेट सांत्वनपर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. आज संध्याकाळी जे डब्ल्यू मॅरीयेट हॉटेलमध्ये ही भेट झाली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अमित शाह यांची सांत्वनपर भेट असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी अमित शाह यांनी आपुलकीने टिळक कुटुंबियांची चौकशी केली.

टॅग्स :Pune NewsAmit Shah