Pune By poll Election : भाजपाला घाम फुटलाय; पुण्यातल्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया | Pune By poll election BJP Kasaba Pimpri Chinchwad By poll sanjay Raut Ravindra Dhangekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut
Pune By poll Election : भाजपाला घाम फुटलाय; पुण्यातल्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Pune By poll Election : भाजपाला घाम फुटलाय; पुण्यातल्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या दोन्ही जागांवर अनुक्रमे मविआ आणि भाजपाने सत्ता मिळवली. कसब्यात मात्र पॉवरफुल प्रचार करुनही भाजपाला हार मानावी लागली. याबद्दलच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कसबा मतदारसंघातून भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. मात्र तरीही रासने निवडून न येता काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी विजय मिळवला. तर पिंपरी चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपाकडून निवडून आल्या आहेत.

या दोन्ही निवडणुकांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "भाजपाला आता घाम फुटलाय. चिंचवडलाही त्यांचा विजय झालाय, असं काही मी मानत नाही. भाजपाने आमच्यातलाच एक बंडखोर उभा केला. त्यामुळे तिथे त्यांना थोडाफार विजय मिळालेला आहे."