Pune Crime : पुण्यातील क्रूर घटनेवर मोठी अपडेट, गुंडानी तोडलेला हात पुन्हा जोडला

100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याची घटना घडली.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newssakal

पुण्यातील पाषाण परिसरातील धक्कादायक घटना समोर आली. 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याची घटना घडली. या विद्यार्थ्यांच नावं पंकज तांबोळी असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी तात्काळ पंकज वर शस्त्रक्रिया करत हाताचा तुकडा जोडला आहे. (Pune Crime doctor joined hands pankaj tamboli wrist for not paying 100 rupees )

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा काही मिनिटातंच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंकजला प्राथमिक उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले आणि तेथील डॉक्टर यांनी त्याच्या हाताचा तुकडा प्लास्टिक बर्फाच्या बॅग मध्ये ठेऊन (जेणेकरून त्या अव्याव्य मधील सेल डेड होऊ नये) पुढे लोकमुद्रा रग्णालयात पंकजला दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ पंकज वर शस्त्रक्रिया करून हाताचा तुकडा जोडला.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

नेमकं काय आहे प्रकरण?

पंकज तांबोळी त्याच्या मित्रांसह मेस बंद असल्यामुळे ३१ डिसेंबर रात्री जेवायला गेला. त्यावेळी पंकज हा त्याच्या मित्रांसह रस्त्यावर हुल्लडबाजी करत होता. रात्री १२.१५ दरम्यान "पार्टी" झाल्यानंतर पंकज त्याच्या मित्रांसह रस्त्यावरून ये जा करणाऱ्याला "हॅप्पी न्यू इयर", "हॅप्पी न्यू इयर" अशी हुल्लडबाजी करत होते.

त्याच वेळी आरोपी त्याच्या अल्पवयीन साथीदारासह तिथे आला आणि त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि त्यातून आरोपीने कुऱ्हाडीने त्याच्या हातावर वार केले आणि यात पंकजचा हाथ मनगटापासून खाली पडला. यावेळी रक्स्तव खूप झाला .

Aurangabad Crime News
Pune Crime : क्रूरतेचा कळस! 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला

काय होता वाद?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण भागात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (२४) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (१८) आणि गौरव गौतम मानवतकर (२०) अशी अटक केलेल्यांची नावं आहे.

फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर आणि पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली.

Aurangabad Crime News
Year Ender 2022 : पुण्यातल्या 12 महिन्यातल्या 22 घटना; ज्यांचा परिणाम राज्यावर झाला

पण पंकजने मात्र पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com