
Pune Crime : झोपलेल्या बायकोच्या गळ्यावर वार; पुण्यातल्या पिसोळी येथीन घटनेने खळबळ
Pune News : चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यामध्ये नवऱ्याने बायकोचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्याच्या पिसोळी भागामध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
आज दि. 30 मे रोजी दुपारी तीन वाजता खूनाची घटना घडली. पिसोळी येथील पद्मावती हाईट या इमारतीमधील फ्लॅट नंबर 502 येथे ही घटना घडली. येथील आरती विकास झा (वय 26) या महिलेचा आरोपी नामे रणजीत उर्फ विकास झा याने खून केला. आरोपी हा महिलेचा पती आहे. पत्नी आरती झा हिच्या चरित्रावर संशया घेऊन त्याने तिला संपवलं. ती झोपलेली असतांना चाकूने तिच्या गळ्यावर भोकसून व गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे.
रणजीत उर्फ विकास झा (वय 36) हा मुळचा बिहारचा असून त्याचा ड्रायव्हिंगचा व्यवसाय आहे. आज अचानक त्याने पत्नीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. कायद्याचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.