साखर उत्पादनात पुणे विभाग दुसरा

साखर उत्पादनात पुणे विभाग दुसरा

सोमेश्वरनगर - एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपणार आहे. सद्यःस्थितीत १९५ पैकी १९० कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. राज्यात ९५२ लाख टन उसाचे गाळप करून १०७ लाख टन साखर निर्माण झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखर उतारा ०.०३ टक्‍क्‍यांनी वाढला असून, साखर उत्पादनही एक लाख टनांनी वाढले आहे. दरम्यान, उतारा, गाळप आणि साखर उत्पादनात कोल्हापूरच आघाडीवर राहिला आहे.

महाराष्ट्रात मागील हंगामात १८७ कारखाने चालू झाले होते. २५ एप्रिलअखेर १६९ कारखान्यांचा हंगाम संपला होता आणि ९४७ लाख टन उसाचे गाळप करत १०६३ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली होती. या वर्षी उसाचे प्रमाण काहीसे जास्त असल्याने १९० कारखान्यांनी हंगाम घेतला. पुणे विभागातील चार आणि नागपूर विभागातील एक कारखाना अद्याप सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चार लाख टनांनी गाळप वाढले आहे. हंगामाच्या मध्यापर्यंत साखर उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर होता; परंतु हंगामाच्या अंतिम टप्प्यात कोल्हापूर विभागातील ३८ कारखान्यांनी २६७ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करताना १२.३८ टक्के साखर उतारा राखून प्रथम स्थान पटकावले आहे. पुणे विभाग दुसऱ्या स्थानी असला, तरीही केवळ २८ कारखान्यांनी २३८ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करताना ११.६१ टक्के इतका समाधानकारक उतारा राखला आहे. पुणे विभाग व सोलापूर विभागाने २०५ लाख टन ऊस गाळप केले आहे. मात्र सोलापूरचा साखर उतारा १०.२३ टक्के राहिल्याने साखरनिर्मितीत जवळपास २८ लाख क्विंटलचा फरक राहिला आहे.

सर्वच बाबतीत ‘सहकार’च अव्वल
राज्यात १०२ सहकारी, तर ९३ खासगी कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. सहकारी कारखान्यांनी ५५६ लाख टन उसाचे गाळप करून ६३.८९ लाख टन साखर तयार केली. खासगी कारखान्यांनी ३९६ लाख टन उसाचे गाळप करून ४३.२८ लाख टन साखर तयार केली. सहकारी कारखान्यांनी ११.४९ टक्के साखर उतारा प्राप्त केला, तर सहकारी कारखान्यांना १०.९१ टक्‍क्‍यांवरच समाधान मानावे लागले. याचाच अर्थ गाळप, उतारा, साखर उत्पादन या सर्वच बाबतीत सहकार 
सरस ठरला आहे. यामुळे सहकार भावातही सरस ठरणार  आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com