राज्यात थंडीची चाहूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे - मॉन्सून परतल्याने विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नगरमध्ये 12.7; तर पुण्यात 16.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.

दिवाळी संपताच राज्यात अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतेक ठिकाणी किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. रात्री उशिरा आणि पहाटे गारवा जाणवत आहे. परभणी, यवतमाळ, नगर येथे तापमानात तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसने; तर जळगाव, महाबळेश्‍वर, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट होत आहे.

पावसाची शक्‍यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. 27) मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. पुण्यातही येत्या दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज आहे.

Web Title: pune maharashtra news cold