उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

भारतात तसेच परदेशांतील संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊन जिद्द, मेहनतीच्या बळावर यश मिळवू पाहणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी श्रीकांत मंगेशकर यांचा संक्षिप्त परिचय.

श्रीकांत नेमंत मंगेशकर (वय २२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. न्यूक्‍लीअर तंत्रज्ञानातील उच्च शिक्षणासाठी स्कॉटलंडमधील ग्लासगो युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. रिसर्च कॉन्फरन्स पेपर आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध. व्यंग्यचित्र काढणे, फुटबॉल खेळण्याची आवड. पॉवरलिफ्टिंग तसेच साहसी खेळांचीही आवड.

दानशूर व्यक्तींना आवाहन
पुढील वर्ष (२०१९-२०) ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे ‘हीरकमहोत्सवी वर्ष’ आहे. यानिमित्ताने हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती द्यावी, असा फाउंडेशनचा मानस आहे. समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली, तरच हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही वाढीव रक्कम देता येणे शक्‍य होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. दिलेल्या आर्थिक मदतीवर प्राप्तिकर सेक्‍शन ८० जी खाली सवलत मिळू शकते, याची देणगीदारांनी कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क - २४४०५८९७, २४४०५८९४ किंवा २४४०५८९५ (वेळ सकाळी १० ते दुपारी १)

Web Title: pune maharashtra news high education student help sakal india foundation