मराठ्यांचा इतिहास पोचणार अटकेपार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

भारतातील प्रांतीय भाषांसह इंग्रजीत भाषांतरासाठी संशोधन प्रकल्प

पुणे - शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोचला. अटकेपार झेंडा फडकावीत मराठ्यांनी हा इतिहास जिवंत ठेवला, नव्हे इथल्या प्रत्येकाच्या हृदयात रुजविला. हाच देदीप्यमान इतिहास आता भारतीय भाषांसह इंग्रजीत शब्दबद्ध होऊन पुन्हा एकदा जगभर दुमदुमणार आहे.

त्यासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि वीर बाजी पासलकर स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली आहे.

मराठ्यांचा इतिहास ठराविक क्षेत्रापर्यंत मर्यादित राहू नये, हा इतिहास जगातील प्रत्येक व्यक्तीला वाचायला मिळावा आणि ज्या प्रांतांमध्ये मराठे लढले, त्या प्रांतातील नागरिकांनाही या कार्याची माहिती व्हावी, या दृष्टीने भारतीय व पाश्‍चात्त्य भाषांमध्ये हा इतिहास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे. तमीळ, कन्नड, मल्याळम या भारतीय आणि इंग्रजी या भाषांमध्ये हा इतिहास लिहिण्यात येणार आहे. त्यासाठी खास ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. 

याविषयी इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘‘या संशोधन प्रकल्पांतर्गत मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांनी विविध प्रांतात केलेल्या कामाच्या माहितीचे भाषांतर केले जाणार आहे. विशेषतः शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व पुस्तकाच्या माध्यमातून जगभर पोचविण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत. महाराजांचे पराक्रम, रयतेसाठीचे कार्य, प्रशासकीय व लष्करी व्यवस्था, व्यवस्थापन, विविध योजना यांची त्यामध्ये माहिती असेल. शहाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज ते पेशव्यांपर्यंतचा इतिहास त्यामध्ये असेल. हा इतिहास विविध प्रांतातील आणि तरुण पिढीला कळावा, म्हणूनच आम्ही सखोल अभ्यास करून हा प्रकल्प राबवीत आहोत.’’

संशोधन प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग 
सैन्य भरती मार्गदर्शन वर्ग 
पराक्रमाचा परिचय देणारे प्रदर्शन 
तरुणांना इतिहास संशोधनाची संधी 

मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधन व्हावे. मराठ्यांनी विविध प्रांतांमध्ये केलेले कार्य त्या त्या प्रांताच्या भाषेत भांषातरित करून तेथील लोकांना वाचण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सिंहगड रस्ता येथील वीर बाजी पासलकर स्मारकात ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. तसेच तरुणांना मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागातील तरुणांना सैन्याविषयी आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी सैन्यभरती मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
- राजाभाऊ पासलकर, अध्यक्ष वीर बाजी पासलकर स्मारक समिती

Web Title: pune maharashtra news maratha history in the world