मॉन्सून 48 तासांत महाराष्ट्रात धडकणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पुणे - केरळमध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) बुधवारी (ता. 7) कर्नाटकात दाखल झाला. पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मॉन्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे - केरळमध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) बुधवारी (ता. 7) कर्नाटकात दाखल झाला. पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मॉन्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला. या दरम्यान चक्रीवादळ बांगलादेशातील किनारपट्टीला धडकून शमले. त्यानंतर मॉन्सून पुढे घेऊन जाईल, अशी स्थिती नव्हती. गेल्या सात दिवसांपासून मॉन्सूनने केरळमध्ये मुक्काम केला होता. आता पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मॉन्सूनने कर्नाटकात प्रवेश केला आहे. मॉन्सून साधारणपणे 5 जूनला कर्नाटकात येतो. या वेळी मात्र त्याला कर्नाटकात दाखल होण्यास दोन दिवस उशीर झाला आहे. अरबी समुद्र, कर्नाटक, तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या परिसर, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मॉन्सून लवकर पुढे सरकण्याची शक्‍यता असून, पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

अरबी समुद्राच्या पश्‍चिम भागात तयार झालेले चक्राकार वारे ओमानकडे सरकत असून त्याची तीव्रता कमी होत आहे. तसेच पंजाब ते ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येही असेल. आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाच्या दक्षिण भागासह बंगाल उपसागराच्या पश्‍चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच झारखंड आणि बिहारच्या आग्नेय भागातही अशीच स्थिती आहे. समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर ही स्थिती असल्याने मॉन्सूनचा पुढचा प्रवास वेगाने होईल, असा विश्‍वासही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कर्नाटकात मॉन्सून दाखल होण्याच्या तारखा
वर्ष तारीख

2017 -- 7 जून
2016 --- 9 जून
2015 -- - 7 जून
2014 -- 9 जून
2013 --- 2 जून
2012 -- 5 जून

Web Title: pune maharashtra news monsoon 48 hrs. in maharashtra