तुरळक पावसाचा अंदाज; राज्यात तापमान वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे- राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर मंगळवारी (ता. २०) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचे ढग दूर होताच राज्याच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० अंशांच्या खाली आलेले तापमान पुन्हा तिशीपार पोचले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी दुपारनंतर ढग गोळा झाले होते. पुणे व पिंपरी परिसरात दुपारी पावसाची जोरदार सर आली होती.

Web Title: pune maharashtra news rain temperature