तापमानात पुन्हा वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - राज्यात हवामान निरभ्र आणि कोरडे होत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीवर गेले अाहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील भिरा येथे तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार गेल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. बुधवारी (ता.२१) विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज आहे. 

मागील अाठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सरासरीच्या खाली उतरलेले कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक प्रमुख शहरांचे तापमान ३५ ते ३६ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

Web Title: pune maharashtra news temperature increase