राज्यातून थंडीचा काढता पाय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

पुणे - मकरसंक्रांतीनंतर राज्यातील थंडी पळाली असून, पुण्यात किमान तापमानाचा पारा 18 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. विदर्भातही थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 9.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुणे - मकरसंक्रांतीनंतर राज्यातील थंडी पळाली असून, पुण्यात किमान तापमानाचा पारा 18 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. विदर्भातही थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 9.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

उत्तर महाराष्ट्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत हवामान कोरडे असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. 16) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. येत्या शनिवारपर्यंत (ता. 20) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरात आकाश मुख्यत निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत वाढ झाली आहे. भिरामध्ये 20.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली. निफाडमध्ये 13.0 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील किमान तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली. परभणीतील कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये 13.5 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. गोंदियापाठोपाठ नागपूरमध्ये 10.4 अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

पुण्यात उन्हाचा चटका
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने उन्हाचा चटका वाढत आहे. रात्री आणि पहाटे असणारा हवेतील गारठाही कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानात सात अंश सेल्सिअसने वाढ होऊन 18 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

Web Title: pune maharashtra news temperature increase