चटका वाढला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे - राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्याही वर गेल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी म्हणजे 41 अंश सेल्सिअस तापमानाची रविवारी नोंद झाली. येत्या बुधवारपर्यंत (ता. 28) तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील दिवस आणि रात्रीच्या तापमानाचा पारा पुन्हा सरासरीच्या वर सरकला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमानासह उन्हाच्या झळा वाढल्या आहेत; तर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. रात्रीचे तापमान सरासरीच्या खालीच असल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावत कायम आहे. रविवारी पश्‍चिम बंगालपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत होते.

प्रमुख शहरांतील रविवारी सायं. 5.30 पर्यंतचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
सांताक्रूझ (मुंबई) - 41
अकोला - 40.5
सोलापूर - 40.2
परभणी - 40
जळगाव - 39.2
नागपूर - 39
कोल्हापूर - 37.3
नाशिक - 37.3
पुणे - 37

Web Title: pune maharashtra news temperature summer increase