पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

पुणे - कोकणासह घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मॉन्सून) दमदार पुनरागमन झाले आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

पश्‍चिम मध्य प्रदेश आणि परिसरात तयार कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच, दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञांतर्फे देण्यात आले आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यातील पाऊस (मिलिमीटरमध्ये शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5.30)
पुणे .... 1
जळगाव ... 1
कोल्हापूर ... 3
महाबळेश्‍वर ..... 75
नाशिक........ 39
सांगली .......... 3
सातारा ............. 7
सांताक्रूझ ........... 37
अलिबाग .......... 15
रत्नागिरी ......... 8
भिरा ........ 28
परभणी ....... 3
अकोला ....... 2
गोंदिया ......... 6

Web Title: pune news highspeed rain signal over the next two days