माॅन्सूनची मजल महाबळेश्वरपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - माॅन्सूनने रायगडातील श्रीवर्धन, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील महाबळेश्वर, कर्नाटकातील बिजापूर, कुर्नूल, ओगोलेपर्यंत मजल मारली आहे. आज (ता. १२) माॅन्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून, पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पुणे - माॅन्सूनने रायगडातील श्रीवर्धन, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील महाबळेश्वर, कर्नाटकातील बिजापूर, कुर्नूल, ओगोलेपर्यंत मजल मारली आहे. आज (ता. १२) माॅन्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून, पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

सध्या माॅन्सून अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्रातील कर्नाटकातील उत्तर भागात दाखल झाला आहे. तसेच कोकणचा उत्तर भाग, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, मराठवाडा, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ईशान्य भारतातील त्रिपुरा, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम उडीसा या भागांत दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ईशान्य भारतातील काही भागांत माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागराच्या परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. येत्या ४८ तासामध्ये स्थितीचे रूंपातर चक्राकार वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थानच्या उत्तर भाग ते अंदमान समुद्राच्या उत्तर भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या भागात व्यापेल. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असेल. पाकिस्तानच्या मध्य ते राजस्थानचा पश्चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर तसेच मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग ते केरळचा उत्तर भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र हळूहळू  केरळकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. 

गेल्या ४८ तासामध्ये केरळ, कर्नाटक, कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागात मुसळधार पाऊस झाला. तर लक्षद्वीप, सौराष्ट्र, कच्छ छत्तीसगड, उडिसा, हिमालच प्रदेश या भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, रायलसीमा आणि तेलंगाना, जम्मू आणि काश्मीर, तमिळनाडू, पाँडेचेरी आणि आंध्र प्रदेश या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

Web Title: pune news monsoon rain