"दिसाआड दिस' लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नागनाथ खरात या विद्यार्थ्याने तयार केलेल्या "दिसाआड दिस' या लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बोस्निया येथे झालेल्या समारंभाला जाण्यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्याला आर्थिक मदत केली होती. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नागनाथ खरात या विद्यार्थ्याने तयार केलेल्या "दिसाआड दिस' या लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बोस्निया येथे झालेल्या समारंभाला जाण्यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्याला आर्थिक मदत केली होती. 

नागनाथ हा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचा विद्यार्थी आहे. बॉस्नियातील हर्जेगोविना येथे "व्हिवा फिल्म फेस्टिव्हल' हा लघुपट त्याने पाठविला होता. त्याला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा "गोल्डन बटरफ्लाय ऍवॉर्ड' मिळाला आहे. त्याने पर्यावरण या गटात प्रवेशिका भरली होती. नाथनाथला बोस्नियाला जाण्यासाठी आर्थिक विवंचना होती. परंतु कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पुढाकार घेत विद्यापीठामार्फत त्याच्या प्रवासासाठी आर्थिक मदत मिळवून दिली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याचे नागनाथचे स्वप्न साकार होऊ शकले. 

या महोत्सवासाठी जगभरातील एक हजार 600हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी 45 देशांतील 89 फिल्म अंतिम फेरीत तीन श्रेणीमध्ये विभागण्यात आल्या. पर्यावरण गटात जगातील 36 लघुपट होते. त्यात "दिसाड दिस' होता. या लघुपटाची अर्थपूर्ण कथा आणि कथनशैली ताकदीची असल्याचे नमूद करीत स्पर्धेचे पंच अली अमेरी आणि मार्टिन टैस यांनी लघुपटाला प्रथम क्रमांक दिला. 

नागनाथ हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. समाधान माने, दीपक शिंदे, योगेश जाधव या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने लघुपटाची निर्मिती केली. त्याच्या या लघुपटाला पुणे, बंगळूर येथील फेस्टिव्हलमध्येही पुरस्कार मिळाले आहेत. इटली, वॉशिंग्टन (अमेरिका), ढाका (बांगलादेश) येथील फिल्म महोत्सवामध्ये ती दाखवली गेली होती. आता या फिल्मला आंतररराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. 

Web Title: pune news nagnath kharat